अकरावी प्रवेशाला मिळाली गती

Foto
7638 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
दहावी परीक्षेचा नुकताच निकाल लागला. त्यामुळे अकरावी प्रवेशाला गती वाढली आहे. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी देखील करणे सुरू झाले आहे. आतापर्यंत 7638 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. 
मागील काही वर्षांपासून अकरावी प्रवेशप्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी मनपाअंर्तगत महाविद्यालयात अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जात आहेत. यंदा कोरोनामुळे दहावी निकालाला विलंब झाला. त्यात अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहेत. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया देखील सुरू केली आहे. परंतु दहावी निकाल लागलेला नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नव्हती. अनेक विद्यार्थी गेले एक महिन्यापासून दहावी निकालाची प्रतीक्षा करत होते. परंतु अखेर राज्यमंडळाने काल(दि.29) दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यामुळे प्रतीक्षा संपली आणि अकरावी प्रवेशासाठी मार्ग मोकळा झाला. दहावीचा निकाल लागताच अकरावी प्रवेशाला गती आली आहे. दहावीचा निकाल लागताच क्षणी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत अकरावी प्रवेशासाठी एकूण 7638 विद्यार्थ्यांनी नोंदणी देखील केली आहे.